सुर्योदया सेवाभावी संस्था

आमच्याविषयी:

महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग आर्थिक, पायाभूत तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद,जालना, हिंगोली, बीड आणि परभणी या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठवाड्यामध्ये शिक्षणाची मुख्य केंद्रे म्हणून मुख्यतः औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या शहरांकडे पहिले जाते. परभणी हा तसा शैक्षणिकदृष्ट्या मागसलेला जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात शैक्षणिक सुविधांची कमतरता आढळून येते. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील बनवस येथे श्री. ज्ञानोबा ढेले यांनी परिसरातील भटके विमुक्त जाती, जमाती आणि अनुसूचित जाती मधील शैक्षणिक मागासलेपण लक्षात घेऊन सुर्योदया सेवाभावी संस्थेची स्थापना १९९६ साली केली. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील भटके जाती, जमातीतील विद्यार्थ्यांना तसेच समाजातील इतर घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षण विभाग सुरु केले. परिसरातील भटके विमुक्त जाती, जमाती तसेच अनुसूचित जाती यांच्यामधील विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेने वसतिगृह विभाग सुरु करून त्यांना शैक्षणिक साहित्य, जेवण, राहणे, आणि इतर सोयी सुविधा पुरविणे सुरु केले.